फोटोग्राफी म्हटले की, अनेकांना वाटते हा काय व्यवसाय आहे, या व्यवसायात चांगले करिअरच नाही. व्यवसाय कारावा असा की, व्यापा-यास मान सम्मान व पैसा मिळेल असा आजकाल या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढली आहे. त्यामुळेग्राहक हा जुन्या व नावलौकीक मिळवलेल्या फोटोग्राफकडे जात असतात, असा समज अनेकांचा आहे. पण आपल्याकडे विचार करण्याची क्षमता तसेच क्रिएटिव्ह करण्याची क्षमता असेल तर नवीनच या व्यावसायात पदर्पण करणारी व्यक्ती नक्कीच जुण्या फोटोग्राफरपेक्षा अधिक नावलौकीक व चांगले स्थान प्राप्त करू शकते.आणि त्यास साथ चांगल्या मार्गदर्शकाची मिळाली तर त्या व्यक्तीची प्रगती झपाट्याने होउ शकते.हे सारे फक्त चिकाटी आणि परिश्रमाने साध्या होउ शकते. फोटोग्राफी व्यावसायात अनेक संधी आहेत. स्टुडीओ फोटोग्राफी, फिल्म फोटोग्राफी, फॅशन फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोगाफी, वेडींग फोटोग्राफी, वाईट्लाईट फोटोग्राफी या सारख्या क्षेत्रांमध्ये अनेक संधी आहेत. आणि योग्य मर्गदर्शन घेउन उच्च पतळीपर्यंत आपणास मजल मारता येवू शकते. तसेच फोटोग्राफी हा फक्त व्यवसाय म्हणूनच करता येते असे नाही. तर अनेक वाहिन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. काही फोटोग्राफर आसेही आहेत की, फोटोग्राफीचा छंद आहे आणि करिअरसुध्दा त्यातच करत आहे. मन लावून काम केले तर नक्कीच यात करिअर करू इच्छिना-या तरूणांना आदर्श म्हणून आपली ओळख प्राप्त हौ शकते.
फोटोग्राफी हा व्यवसाय करु इच्छीना-या तरुणांनी योग्य प्रशिक्षण तसेच डिजिटल तंत्रज्ञानाची माहीती असणे आवश्यक आहे. तसेच फोटोग्राफी हा व्यवसाय करताना त्यात रुची असणे महत्वाचे आहे. या क्षेत्रात कला, क्रिएटिव्हीटी या दोन बाबी महत्वाच्या मानल्या जातात. तसेच वेळोवेळी अपडेट असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी पाळल्या तर ग्राहक नाक्कीच आपणास पसंती देईल.
कॅमेरा व त्याचे एक्सेसरीज या सर्व गोष्टी फोटोग्राफीत महत्वाच्या असतात. पण साधारण कॅमेरा घेवूनही आपण नवलौकीक प्राप्त करु शकतो. यासाठी खुप पैसा लगतो असे नाही.फक्त कॅमेरा कसा वापरायचा आणि आपणास कोणता फोटो कोणत्या पध्दतीने काढायचा याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.